minor murder case | बल्लारपुरात अल्पवयीन मुलाची हत्या; २४ तासांत आरोपी ताब्यात

minor murder case : बल्लारपूर – बल्लारपूर जवळील विसापूर येथे तीन महिन्यांपूर्वी झालेल्या वादाच्या रागातून एका १७ वर्षीय अल्पवयीन युवकाची धारदार शस्त्राने वार करून आणि डोक्यात दगड घालून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. ही थरारक आणि खळबळजनक घटना शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. या हत्याकांडानंतर बल्लारपूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या २४ तासांच्या आत एका विधीसंघर्ष बालकासह (अल्पवयीन) एकूण पाच आरोपींना नागपूर येथून ताब्यात घेतले आहे. (भररस्त्यात अल्पवयीन मुलाची हत्या)

बल्लारपूर पोलिसांनी minor murder case प्रकरणातील आरोपींना नागपुरातून पकडले

मिळालेल्या माहितीनुसार, विराज राजेश आगदरी (वय १७ वर्ष, रा. किल्ला वॉर्ड, बल्लारपूर) असे मृत युवकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी मोनू ऊर्फ रौनक सुखपाल निषाद (वय १९ वर्ष), आकाश रामकरन निषाद (वय २१ वर्ष, दोघेही रा. भगतसिंग वॉर्ड), जिशान शरीफ सिद्दीकी (वय १९ वर्ष, रा. सुभाष वॉर्ड), समीर कलीम खान (वय २१ वर्ष, रा. दादाभाई नौरोजी वॉर्ड) आणि एका विधीसंघर्ष बालकाला अटक केली आहे. minor murder case

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत विराज आणि आरोपींमध्ये सुमारे तीन महिन्यांपूर्वी काही कारणावरून कडाक्याचे भांडण झाले होते. तेव्हापासून त्यांच्यात वैर निर्माण झाले होते. शुक्रवारी संध्याकाळी विराज आपल्या काही मित्रांसह विसापूर येथील तुकडोजी चौकातील एका सलूनमध्ये गेला होता. त्याच वेळी आरोपी दोन दुचाकींवरून तेथे पोहोचले. त्यांच्या हातातील धारदार शस्त्रे पाहून विराज व त्याचे मित्र जीव वाचवण्यासाठी पळू लागले. मात्र, आरोपींनी पाठलाग करून महात्मा फुले चौक ते सुरभी चौक जाणाऱ्या मार्गावर विराजला गाठले. तिथे त्याच्यावर धारदार शस्त्रांनी सपासप वार करण्यात आले. तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर आरोपींनी निर्दयीपणे त्याच्या डोक्यात दगड घालून त्याला जागीच ठार केले आणि घटनास्थळावरून पळ काढला.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस दलात मोठी खळबळ उडाली. बल्लारपूर पोलिसांची तीन विशेष पथके आणि स्थानिक गुन्हे शाखेची (एलसीबी) दोन पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी घुग्घुस, वरोरा मार्गे नागपूर गाठून सर्व आरोपींना २४ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आणि बल्लारपूर येथे आणले. minor murder case

या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षक आयुष निपाणी आणि अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली व तपासाबाबत आवश्यक निर्देश दिले. बल्लारपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात या गुन्ह्याचा पुढील सखोल तपास सुरू आहे.

Leave a Comment