Glaucoma Treatment | चंद्रपुरात आता अत्याधुनिक काचबिंदू उपचार सेवा उपलब्ध

Glaucoma Treatment : चंद्रपूर : डोळ्यांतील काचबिंदू (ग्लॉकोमा) या गंभीर आजारावरील अत्याधुनिक उपचार सेवा आता चंद्रपूर शहरात उपलब्ध झाली आहे. अमेरिकेतील प्रतिष्ठित University of Florida येथे काचबिंदू विषयातील प्रगत आंतरराष्ट्रीय फेलोशिप पूर्ण केलेल्या डॉ. सुरभी मेहरा या आता चंद्रपूरातील मेहरा आय हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा देत आहेत. (बाबुपेठमध्ये आरोग्य शिबीर, हजारो नागरिकांनी घेतला लाभ)

डॉ. सुरभी मेहरा या काचबिंदू तज्ज्ञ असून त्यांनी आधुनिक आणि वैज्ञानिक पद्धतीने ग्लॉकोमा उपचार, तपासणी व शस्त्रक्रिया क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविले आहे. विशेष म्हणजे, त्यांनी अमेरिकेतून उच्च दर्जाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर आता आपल्या मातृभूमीत सेवा देण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे चंद्रपूरसह परिसरातील रुग्णांना महानगरात न जाता अत्याधुनिक उपचार स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत.

चंद्रपुरातील मेहरा आय हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आधुनिक Glaucoma Treatment

मेहरा आय हॉस्पिटलमध्ये ग्लॉकोमासाठी अत्याधुनिक MIGS (Minimally Invasive Glaucoma Surgery) तंत्रज्ञान, लेझर उपचार, ग्लॉकोमा ड्रेनेज इम्प्लांट, उच्च-जोखीम रुग्णांसाठी विशेष उपचार योजना तसेच नियमित स्क्रीनिंग सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. काचबिंदू हा डोळ्यांच्या नसांना हानी पोहोचवणारा गंभीर आजार असून वेळेत निदान व उपचार न झाल्यास कायमस्वरूपी दृष्टी कमी होण्याचा धोका असतो. त्यामुळे लवकर तपासणी आणि योग्य उपचार अत्यंत महत्त्वाचे असल्याचे डॉ. मेहरा यांनी सांगितले. Glaucoma Treatment

रुग्णांना कमी वेदना, जलद रिकव्हरी आणि सुरक्षित उपचार पद्धती उपलब्ध करून देण्यावर भर असल्याचेही त्यांनी नमूद केले. चंद्रपूर शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाची नेत्रसेवा उपलब्ध झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Leave a Comment