Sindewahi Tiger Attack । गुंजेवाही जंगलात भीषण घटना, चार कुटुंबांचा आधार हिरावला

Sindewahi Tiger Attack घटनेनंतर सिंदेवाहीच्या गुंजेवाही जंगल परिसरात वनविभाग आणि ग्रामस्थांची हालचाल दर्शवणारे दृश्य.

Sindewahi Tiger Attack : चंद्रपूर: मानव-वन्यजीव संघर्षाचा ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंदेवाही तालुक्यात आज पुन्हा एकदा वाघाच्या भीषण हल्ल्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही वनपरिक्षेत्रातील बिट क्रमांक १८३६ मध्ये तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या चार महिलांचा वाघाच्या हल्ल्यात जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना २२ मे रोजी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली. … Read more