Women Safety Chandrapur : चंद्रपूर – चंद्रपूर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्ह्यात अवैध धंद्यावर प्रहार सुरु असून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
गोवंश तस्करी, अंमली पदार्थ व सुगंधित तंबाखू माफियांचे पोलीस कारवाईमुळे चांगलेच धाबे दणाणले आहे, आता पोलीस अधीक्षकांनी महिला सुरक्षेवर भर दिला असून, २१ मे रोज मंथन हॉल मध्ये एसपी आयुष नोपानी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीची महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. जिल्ह्यातील महिला व जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य व तातडीची मदत कशी मिळवून देता येईल यावर बैठकीत चर्चा झाली.
चंद्रपूर जिल्ह्यात Women Safety Chandrapur पोलिसांचे विशेष नियोजन
आयोजित बैठकीत जिल्ह्यातील महिला सुरक्षेवर प्रथम प्राधान्य, महिलांच्या तक्रारींचे जलद निवारण, सार्वजनिक ठिकाणी महिलांची सुरक्षा, पीडित महिलांना कायदेशीर व मानसिक आधार देण्यासाठी दक्षता समितीने अधिक सक्रियपणे काम करावे असे निर्देश पोलीस अधीक्षक नोपानी यांनी दिले. (चंद्रपूर जिल्ह्यातील उष्णतेच्या लाटेत, पाणी टंचाईवर ६९३ उपाययोजना)
एकटे राहणाऱ्या जेष्ठ नागरिकांसोबत अनुचित प्रकार घडू नये, सुरक्षा व त्यांची समस्या त्यावर येणारी अडचण यावर चर्चा करीत यंत्रणा अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेण्यात आला जेणेकरून भविष्यात जेष्ठ नागरिकांना अडचण यायला नको.
पोलीस प्रशासन, दक्षता समिती व जेष्ठ नागरिक समिती यांच्यात समन्व्य कसा राखता येणार, ज्यामुळे जिल्ह्यात महिला व जेष्ठ नागरिकांना असुरक्षिततेची भावना त्यांच्या मनात निर्माण होऊ नये यावर रणनीती आखण्यात आली. Women Safety Chandrapur
आयोजित बैठकीत पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, भरोसा सेल सपोनि प्रज्ञा वाडेकर, पोउपनि रवींद्र चेरकुलवार, पूनम आसेगावकर, प्रियंका पेंदोर, डॉ. नसरीन मावाणी, आम्रपाली लोखंडे, प्रीती खातखेडे, भावना रंगारी, उज्वला पॉईनकर, डॉ. अल्का ठाकरे, पुष्पा उराडे, श्रीराम तोडासे, पुरुषोत्तम राऊत, रमेश कासुलकर, रमेश ददगाळ, गोसाई बल्की यांची उपस्थिती होती.